ब्रेकिंग

पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना मातृशोक, ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील (MLA Kishor Patil) यांच्या मातोश्री ग. भा. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे आज सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 सोमवार रोजी सकाळी 4: 55 वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील यांच्यावर मागील काही दिवसांपासून प्रकृती अवस्थेमुळे उपचार सुरू होते. दरम्यान, आज त्यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांच्या पार्थिवावर आज पाचोऱ्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता.

यावेळी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह पत्रकार समाजसेवकांनी आमदार पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. त्यातून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कमावलेली माणसांची श्रीमंती, स्व. नर्मदाबाई यांनी जपलेली नाती-गोती, त्यांची गावकी-भावकी व गोतावळा यांचा प्रत्यय आला. एव्हढा प्रचंड लोकसमुदाय जोडणे आणि टिकवणे निश्चितच सोपे नाही, हे ही दिसून आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे