आपल खान्देशमहाराष्ट्र

महाविकासआघाडीतील एका आडमुठ्या नेत्यामुळे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले: प्रकाश शेंडगे

पदोन्नती रोखण्याच्या निर्णयाचा फटका केवळ मागासवर्गीयच नव्हे तर धनगर आणि ओबीसी समाजालाही बसेल |

मुंबई: महाविकासआघाडीतील एका आडमुठ्या नेत्याच्या भूमिकेमुळे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले, अशा शब्दांत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. या निर्णयासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मतही शेंडगे यांनी व्यक्त केले. (गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रकाश शेंडगे यांनी पदोन्नतीसंदर्भात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे म्हटले. पदोन्नती रोखण्याच्या निर्णयाचा फटका केवळ मागासवर्गीयच नव्हे तर धनगर आणि ओबीसी समाजालाही बसेल, असे शेंडगे यांनी म्हटले. मागासवर्गियांची पदोन्नती रोखण्याचा निर्णय कुठलीही कॅबिनेट बैठक न करता घेण्यात आला. हे साफ चुकीचं आहे. महाविकासआघाडीतील एका नेत्याच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा जीआर काढण्यात आल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे