कोरोना पाचोरा : कोव्हिड रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवा पुरवणारे शिवाज ग्रुप
घाबरू नको मी तुना सोबत…. म्हणत शिवाज ग्रुपला रुग्णसेवेने झपाटलंय. हॉस्पिटलमध्ये रिक्षेतून पोहचवण्यासाठी 24 तास मोफत सेवा
श्री दिलीप परदेशी
पाचोरा Live 24/
Date -18/05/21 @ zoom marathi news media
पाचोरा | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही सध्या लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडता येत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे बेड व ऑक्सिजन सिलेंडरप्रमाणेच रुग्णवाहिकांची देखील कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळेच या काळात शिवाज ग्रुपच्या वतीने पाचोरा शहरात रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्याने 24 तास रिक्षा मोफत सेवा देत आहेत. तसेच उमेश एरंडे आणि शुभम पाटील हे शिवाज ग्रुपच्या वतीने गरजू रुग्णांचीदेखील मदत करत आहेत.

करोना काळात अनेक जण आर्थिक संकंटांना सामोरं जात आहेत. त्यातच कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालय गाठण्यासाठी होणारी धावपळ या सगळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाज ग्रुपच्या वतीने रिक्षातून रुग्णांना 24 तास रुग्णालयापर्यंत मोफत सेवा देत आहेत. वैद्यकीय स्टाफला तसेच शहरातील सर्व घटकांसाठी दवाखान्यासाठी व लस घेण्यासाठी अथवा कुढल्याही मेडिकल कामासाठी हि सेवा उपलब्ध करतात. वेळीच उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. एकीकडे रुग्णवाहिका वेळेवर मिळत नाहीये. तर दुसरीकडे खासगी रुग्णवाहिकांचं बील गरजुंना परवडत नाही. त्यामुळेच आम्ही अशा गरजुंना रिक्षाद्वारे मोफत सेवा देण्याचा निर्धार केला”, असं उमेश एरंडे आणि शुभम पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.



