आपल खान्देशमहाराष्ट्र

धुळे जिल्ह्यातल्या निमगुळगाव करोना मुक्त!!

झूम मराठी न्यूज वेब मीडिया

संपादक- श्री दिलीप परदेशी 

धुळे (निमगुळ) | कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र जाणवू लागला असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. अश्यातच धुळे जिल्ह्यातील निमगुळ हे गाव कोरोनामुक्त झाले. निमगुळ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुळे जिल्ह्यातल्या निमगुळ गावात संसर्गाचं थैमान घातलं. वेगाने वाढणारी साथ आटोक्यात कशी आणायची? सरकारी यंत्रणा कुठे-कुठे पुरुन उरणार? तीव्र लक्षणं दिसणाऱ्या आणि लवकर गंभीर होणाऱ्या रुग्णांचा जीव कसा वाचवायचा? या प्रश्नांशी उत्तरं शोधण्यासाठी अख्ख्या गावाने कोरोना व्हायरसचा पाठलाग केला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग आणि वेळेवर उपचार ही त्रिसूत्री वापरत सिंदखेड तालुक्यातल्या निमगुळच्या गावकऱ्यांनी अवघड वाटणारं कोरोनाविरोधातलं युद्ध जिंकलय. 1 मे पासून गावात एकही कोव्हिडचा रुग्ण आढळलेला नाही. आज निमगुळ कोरोनामुक्त झालंय.

या गावाने करोनाला हरवलेच, कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती केली. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत तपासणीसाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास नागरिकांनी सत्य ती सर्व माहिती दिली, कोणतीही माहिती लपवू नये. कोरोनाची काही लक्षणे असल्यास अथवा काही त्रास होत असल्यास तात्काळ तपासणी करून उपचार घ्यावेत. कोणीही दुखणे अंगावर काढू नये. सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. नेहमी मास्कचा वापर व हात वारंवार धुवावेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी या बाबी कटाक्षाने पाळाव्यात अश्या प्रकारे करोना मुक्त मोहीम चालवत 1 मे पासून गावात एकही कोव्हिडचा रुग्ण आढळलेला नाही. आज निमगुळ कोरोनामुक्त झालंय.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे