पाचोऱ्याच्या रुपाली सतीश जाधव यांना ‘आदर्श शिक्षिका’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित..

जळगाव | राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन (गव्हर्मेंट ऑफ इंडिया) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात पाचोऱ्याच्या सौ. रुपाली सतीश जाधव यांना ‘आदर्श शिक्षिका’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी जळगाव येथे हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत सौ. रुपाली सतीश जाधव यांची ‘आदर्श शिक्षिका’ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सौ. रुपाली जाधव यांना स्मृतिचिन्ह, मेडल व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून आले. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांसह सहकारी, विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.
शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य सौ. रुपाली जाधव सातत्याने करीत आहेत. त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर झालेली दखल ही शैक्षणिक क्षेत्रासाठी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या पुरस्कारामुळे सौ. रुपाली सतीश जाधव यांच्या शैक्षणिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यातही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.सौ. रुपाली जाधव यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल पाचोरा तालुक्यासह सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


