आपल खान्देशकृषीवार्ता

पाचोरा तालुक्यात आखतवाडे शिवारात बिबट्याचा वावर,

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे गावाच्या शेतशिवारात आज दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री दूधगाडी चालकाला बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले. मुरलीधर नारायण पाटील यांच्या कजगाव रस्त्यालगत बिबट्या दिसून आला. दूधगाडी चालकाच्या नजरेस बिबट्या दुसऱ्यांदा पडला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत गाडीच्या काचा बंद केल्या आणि गाडी सुरक्षितपणे थांबवून बिबट्याचा प्रत्यक्ष फोटो काढला.

या घटनेची माहिती पाचोरा वनविभागाला देण्यात आली असून, वनविभागाचे कर्मचारी सकाळी आखतवाडे गावात भेट देऊन पाहणी करणार आहेत. दरम्यान, बिबट्याच्या वावरामुळे आखतवाडे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात एकट्याने जाणे टाळावे, सतर्क राहावे आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बिबट्याचा वावर आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे