Independent Day | स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात रंगले जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल..
सचिव जीवन जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण; विद्यार्थी-शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

पाचोरा : जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण, देशभक्तीमय आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सचिव जीवन जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले.ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय गीत वंदे मातरम् म्हणण्यात आले. राष्ट्रध्वजाला वंदना करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले.व त्यानंतर लगेच राज्यगीत म्हणण्यात आले.उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.यावेळी विद्यार्थ्यांसमवेत तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली तसेच कॉपीमुक्त राहण्याची सुद्धा शपथ घेण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण तसेच स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करणारे उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचा परिसर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा जयघोषांनी दुमदुमून गेला.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्षा गौरी कुलकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी, संचालक संजय चोरडीया, गुलाब राठोड, प्रभुलाल शर्मा, गोपाल पटवारी, प्रिती जैन, संगिता बोथरा, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर व शेखरकुमार धाडीवाल यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना सोबतच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव, प्रिती शर्मा, पुजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, अश्विनी पाटील, भाग्यश्री ब्राम्हणकर, वैष्णवी पाटील, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, रुक्मिणी कासार, मंदास्मिता पाटील,उज्वला पाटील, हर्षा वाधवा, सानिका पाटील, ललिनी रावडे, मनिषा बडगुजर, निवृत्ती तांदळे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, सुनिता शिंपी, शितल पाटील, उज्वला गायकवाड, शिवाजी पाटील, चेतन देशमुख, हर्षल पाटील व विकास मोरे यांनी अथक परिश्रम घेतले.
शिस्तबद्ध नियोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अत्यंत दिमाखदार व संस्मरणीय ठरला. ‘देशप्रेम, शिस्त आणि संस्कार यांची जपणूक करत उज्ज्वल भारत घडविण्याचा संकल्प’ या भावनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

