आपल खान्देश
पाचोरा शहरात ग्रामीण पत्रकार संघाची बैठक संपन्न
पाचोरा लाईव्ह सिटी रिपोर्टर .
.पाचोरा (झूम मराठी न्यूजनेटवर्क) ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघटनेची पाचोरा येथे बैठक संपन्न झाली सदर बैठकीत मागील कार्यकारिणी नुतन जिल्हा अध्यक्ष सुरेश तांबे व जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन बेलदार यांनी विभागीय अध्यक्ष राजुभाई जावरे यांच्या आदेशाने बरखास्त केली. नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
तत्कालीन जिल्हा अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणी तील पदाधिकारी पदाचा गैरवापर करतांना आढळल्यास त्यांचा वर कारवाई करण्यात येईल.
सदर संघटनेच्या नवीन कार्यकारिणी साठी तत्कालीन पदाधिकारी व सदस्यांनी तसेच नवीन इच्छुकांनी जिल्हा अध्यक्ष सुरेश तांबे व जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन बेलदार यांचा मोबाईल क्रमांक 8208036411, 8308221432 वर संपर्क साधावा.




