आपल खान्देश
बेफिकीर – पाचोरा शहरात भर दिवसा पथदिवे सुरू..
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा नमूना पाचोरा शहरवासीयांना पुन्हा एकदा आला आहे. शहरातील देशमुखवाडी बाहेरपुरा, बाजारपट्टा, कृष्णापुरी या भागात पथदिवे दिवसाही सुरूच असतात. पथदिवे रात्री सुरु व दिवसा बंद करणे अपेक्षित असते.
शहरातील अनेक भागात पथदिवे बंद असताना संबंधित ठेकेदार दिवे बदलण्याची तसदी घेत नसताना दुसरीकडे मात्र दिवसा सुरू असलेले पथदिवे बंद होत नसल्याने विनाकारण विजेचा अपव्यय होत आहे. याबाबत पालिकेच्या वीज कंपनीच्या अधिकार्यांनी त्वरित दखल घ्यावी
राष्ट्रीय ऊर्जेचे संवर्धन करण्याचे संदेश सातत्याने लोकांच्या मनावर बिंबवले जातात. परंतु पथदिवे असे कित्येक दिवस रात्र सुरू राहत असल्याने त्याला नेमके जबाबदार कोण? याचा शोध घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी.



