आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

‘कोणीही उभे राहू द्या, रावेरमध्ये जिंकणार तर रक्षा खडसे’; भाजपचे एकनाथ खडसेंना चॅलेंज…


‘पक्षाचा जर आदेश आला तर मी लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी तयार आहे. इंडियाच्या माध्यमातून रावेर लोकसभेची जागा आली आणि पक्षाने मला जर आदेश दिला तर मी लोकसभा निवडणूक लढवणार’, असे राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचं लोकसभेच्या निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

विशेष म्हणजे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपच्या खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) करत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सासरे विरुद्ध सून असा सामना रंगण्याची शक्यता आहे.


दरम्यान, यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली. ‘रावेरमध्ये कोणीही उभे राहिले तरी आगामी लोकसभा निवडणूक रक्षा खडसे याच जिंकणार. रक्षा खडसे या निवडणुकीत तब्बल दोन लाख मतांनी विजयी होतील. एकनाथ खडसे लोकसभा निवडणुकीत रावेरमधून लढले तरी रक्षा खडसे ती निवडणूक जिंकतील. कारण रक्षा खडसे यांनी मतदारसंघात उत्तम कामे केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात आमच्या सर्वच खासदारांनी चांगले काम केले आहे. रक्षा खडसे यांनीदेखील मतदारसंघात खूप चांगली कामे केली आहेत. मतदारसंघात त्या पायी फिरल्या आहेत. त्यामुळे रावेरमध्ये कोणीही लढले तरी रक्षा खडसे याच जिंकणार इतकी त्यांची ताकद आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे