गुरातमध्ये प्रवेशासाठी “आरटीपीसीआर” चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक; जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन.
गुरातमध्ये प्रवेशासाठी “आरटीपीसीआर” चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक; जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन.
धुळे | धुळे जिल्ह्यातून गुजरात राज्यात जाणाऱ्या प्रवाशांजवळ कोरोना विषाणूची (COVID19) चाचणी केल्याचा आणि ती निगेटिव्ह आल्याचा तीन दिवसांपूर्वीचा (७२ तास) अहवाल असणे आवश्यक आहे. त्यानुसार गुजरात राज्यात जाणाऱ्यांनी आपल्या जवळ कोरोना विषाणूची चाचणी केल्याचा आणि ती निगेटिव्ह आल्याचा “आरटीपीसीआर” चाचणीचा अहवाल जवळ बाळगावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे._
गुजरात राज्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तेथील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने ४१ मार्च २०२१ रोजी आदेश काढला आहे, असे तापी- व्याराचे (गुजरात) जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार धुळे जिल्ह्यातून गुजरात राज्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बस, खासगी वाहने, रेल्वे किंवा अन्य कोणत्याही वाहनाने गुजरात राज्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांजवळ कोरोना विषाणूची “आरटीपीसीआर” चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवाशांना गुजरात राज्यात प्रवेश मिळणार नाही. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.


