मा.प्रवीण काकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची यशस्वी घौडदौड
मा.प्रवीण काकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची यशस्वी घौडदौड
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली ही संघटना *भारतातील एकमेव सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी संघटना* असून अनेक राज्यांमधे काम करीत असून ही संघटना *राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन श्रीराम पाल होळकर, राष्ट्रीय महासचिव श्री प्रेमपाल धनगर,राष्ट्रीय उपाध्यक्ष अजय होळकर,श्रीमंत अमरजितराजे जहागिरदार तळोदा संस्थान नंदुरबार (राष्ट्रीय संरक्षक),कै श्रीमंत सूर्यकांतराजे बारगळ इंदोर, व कै उत्तमराव लंबाते माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष* यांच्या सहकार्याने व आशीर्वादाने ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची *महाराष्ट्र राज्य ची प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी धनगर समाजाचे युवा नेतृत्व गोरगरिबांच्या शिक्षणाची जाण असणारे,डोंगरदऱ्या खोर्यात शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे, ग्राउंड लेव्हल चे नेतृत्व मा प्रविण काकडे यांचेवर दिनांक १६|३|२०१६ रोजी सोपविण्यात आली. तसे काकडे साहेब यांची सुरुवात *२०१२ पासुन सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनच कार्यरत होते.

परंतु सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे हे नेतृत्व नेहमीच पुढे राहीलय* त्यामुळेच ते आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर आज *प्रदेशाध्यक्ष या पदावर कित्येक वर्ष काम करीत असून आपली नोकरी सांभाळून प्रत्येक सुट्टीच्या दिवशीच सामाजिक कार्यक्रमास बाहेर पडतात असे ह्या व्यक्तिमत्त्वाकडुन बरेच काही शिकायला मिळत आहे
कोरोना च्या काळात वर्षभर या व्यक्तिमत्त्वाने डोंगर दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम राबवून संघटनेच्या पदाधिकारी यांना बरोबर घेऊन कोल्हापूर,सांगली सिंधुदुर्ग,रत्नागिरी,सातारा,पुणे, रायगड, या जिल्ह्यातील डोंगर भागात काम करून उल्लेखनीय कार्य केले.आतापर्यंत २३०८ विद्यार्थीना मदत केली असून एवढे मोठे सामाजिक व शैक्षणिक कार्य करणारी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ही संघटना महाराष्ट्रातील व देशातील एकमेव संघटना असावी.
नाहीतर आजकाल कोणही उठतो संघटना काढतो, संघटना काढणे सोपे परंतु चालवणे अवघड. संघटनेने ग्राउंड लेव्हल ला जाऊन काम करणे अपेक्षित आहे. *ग्रामीण भागात जाऊन समाजाचा इतिहास, प्रबोधन, अंधश्रद्धा, शैक्षणिक व आर्थिक, सामाजिक यावर काम करीत रहाने आवश्यक आहे नेमके हेच काम ऑल इंडिया धनगर समाज महासंघ करीत असून कोणत्याही सामाजिक प्रश्नांचा स्टंट न करता हवा न करता हे समाजसेवेचे काम अहो रात्र सुरू होते आणि आहे. सामाजिक प्रश्न सोडवून घेणेच गरजेचे आहे. *खर्या अर्थाने धनगर समाजातील गोरगरीब मुलांना विशेषता डोंगर दऱ्याखोऱ्यातील व जंगलातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे काम प्रवीण काकडे यांनी केले
*ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व त्याच्यावर विश्वास ठेवून काम करणारे समाज बांधव व पदाधिकारी यांनी तयार केले.
आमच्या वेल्हा तालुक्यातील कुशल संघटक तुकाराम कोकरे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख* म्हणून काम करत आहेत काकडे साहेबाच्या बरोबर कोकरे साहेब याचे शिक्षण खूप खूप कमीच परंतु सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून यांना एक नवीन कल्पना सुचली ती म्हणजे *ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली या संघटनेचे ॲप तयार करावे* जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. व जास्तीत जास्त समाज बांधव यांना सदस्य करून आपला समाज एकसंघ करू.आणि हा उपक्रम राबवू असा प्रस्ताव त्यांनी काकडे साहेब यांच्या समोरच ठेवला, आणि साहेबांनी होकार दिला. आणि *१७|३|२०२१ रोजी ऑल इंडिया धनगर समाज महासंघा चे ॲप तयार करण्यात आले व बघता बघता एपची सदस्य संख्या २३००० एवढी झाली
परंतू आमचे ॲप चालु झाल्यावर बाकी च्या ना पोटशूळ उठला व कोणी स्वतचे व्यक्तिमत्त्व,कोणी मंडळ,सेना यावर ॲप चालु केली आहेत.चांगली गोष्ट आहे, परंतु शत्रुत्व निर्माण करण्यासाठी नको, मला तर वाटत आहे की ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची प्रत्येकानेच धसका घेतलाय की काय?
परंतु काकडे साहेब याचे म्हणने एकच की सामाजिक पदे घ्या पण त्या पदाचा उपयोग आपल्या समाजातील गोरगरीब समाज बांधव यांचे साठी होण गरजेचे आहे.पद मिळवण सोप, आश्वासन देण सोप, टिका करण सोप,परंतु काम करण खूप अवघड आहे.
मा प्रविण काकडे (साहेब) नेहमीच कृती करण्यावर भर देण्यात अग्रेसर असतात* महाराष्ट्रात इतक्या धनगर समाजाच्या संघटना आहेत त्यानी कोरोना च्या काळात किती समाज बांधवान साठी काम केले आहे हे समजणे गरजेचेच आहे माझ्या माहितीनुसार मीगेली दोन वर्षापासून पहात आहे की सर्वात जास्त लोकांपर्यंत, व कोरोना काळात सर्वात जास्त काम ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली याच संघटनेने ग्राउंड लेव्हल ला जाऊन काम केले
याचा अनुभव मला माझ्याच अतिशय मागास अतिदुर्गम म्हणून वेल्हा तालुक्यातील शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात आला माझ्याच तालुक्यातील २८२ मुलांना साहित्य वाटप केले. त्यावेळी प्रविण काकडे (साहेब) आपला टीम ला घेवून ३ दिवस डोंगर दऱ्याखोऱ्यात फिरत होते. जिते रस्ता सुधा नाही तिथे चालत जाऊन हा धनगर योद्धा साहित्य वाटप करत होता
आणि म्हणून ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली या सामाजिक संघटनेचे धनगर समाजाचे कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले मा.प्रविण काकडे (साहेब)व त्याचे सर्व पदाधिकारी तसेच त्यांच्या सोबत असलेले समाज बांधव यांना खूप खूप शुभेच्छा….




