आपल खान्देशमहाराष्ट्र

बोलठाण येथे प्रहार शेतकरी संघटनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच, प्रशासन झोपले की काय नागरिकांमध्ये तर्क वितर्क?


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

नांदगाव (मुक्ताराम बागुल) नांदगाव तालुक्यातील बोलठाण परिसरातील अपूर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्याची कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने बोलठाण येथे 16 जानेवारी सोमवार पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगावचे जूनिअर इंजिनिअर चोळके आणि उपशाखा अभियंता जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन अपूर्ण असलेल्या रस्त्यांची कामे फेब्रुवारी अखेरीस पूर्ण करून देऊ अशी आश्वासन दिले.

मात्र यापूर्वीही याच सार्वजनिक उपविभाग बांधकाम‌ नांदगाव यांनी लेखी आश्वासन देऊ नये रस्त्यांची कामे आत्तापर्यंत पूर्ण केलेली नसल्याने आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत रस्त्याची कामे सुरू होऊन पूर्ण होत नाही तोपर्यंत ठिया घेण्याची भूमिका घेतली असून तोडगा निघू शकलेला नाही. आजचा प्रहार शेतकरी संघटनेचा तिसरा दिवस उरला असून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगाव कार्यालयाचे अधिकारी व प्रशासन झोपली की काय? असे तर्क वितर्क बोलताना घाटमाथ्यावरील नागरिकांसह संपूर्ण नांदगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये सुरू आहेत.  नांदगाव सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ढेकु खुर्द ते रोहिले बुद्रुक या सुमारे 18 किलोमीटरच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. झाले तरीदेखील हे काम अपूर्ण अवस्थेत आहे. या मार्गावर नेहमी अपघात घडत असल्याने प्रहार शेतकरी संघटनेने अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करून देण्यासंदर्भात बांधकाम विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र दखल घेतली गेली नसल्याने हे काम अद्याप पर्यंत अपूर्णच आहे. काम अपूर्ण असल्याने प्रहार शेतकरी संघटनेने 6 जानेवारी 2023 रोजी बांधकाम विभागाला अर्जाद्वारे आंदोलन करणार असल्याची सूचना दिली होती तरी देखील रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली नसल्याने आपल्या मागणीसाठी बोलठाण येथे 16 जानेवारी 2023 रोजी सोमवारपासून दुपारी. ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलन करताना घेतली. त्यामुळे हे आंदोलन आणखी लांबण्याची चिन्ह दिसून येत आहे. आजचा 18 जानेवारी 2023 बुधवार तिसरा दिवस उजाडला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे प्रशासनाला या आंदोलनकर्त्यांची व नागरिकांची काहीच काळजी नसल्याचे दिसून येत असून प्रशासन झोपेची सॉंग करत असल्याचे सिद्ध होते.

या आंदोलनात शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, जनार्दन भागवत, रवी भागवत, नंदू झोडगे, रमेश जाधव,वैभव शिंदे, अरिफ शेख, बाळासाहेब चव्हाण, सुभाष गंडे, आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत. 

बांधकाम विभागाच्या गाडीला बांधून घेतले आंदोलनाची पूर्वकल्पना असूनही आंदोलनाद्वारे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉट फिरवल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी बांधकाम विभागाच्या गाडीला स्वतःला बांधून घेत लक्षवेधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलन स्थगितीसाठी प्रयत्न केले मात्र ते निष्पळ ठरले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे