आपल खान्देशब्रेकिंग

पाचोरा भडगाव मतदार संघाच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – 25 कोटींची भरीव तरतूद..!

आमदार किशोर पाटिल यांनी मानले राज्यसरकारचे आभार..!

 

पाचोरा | राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी तब्बल २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्य सरकारने या बजेट मध्ये पाचोरा भडगाव मतदार संघात विकास कामांसाठी तब्बल 25 करोड रुपयांचा निधी दिला असून राज्यसरकारचे आमदार किशोर आप्पा पाटिल यांनी आभार व्यक्त केला. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी रस्त्यांच्या कामांसाठी 25 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हे कामे होणार आहेत.

या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार किशोर पाटिल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच महायुती सरकारचे आभार मानले आहेत. पाचोरा भडगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न असेच सातत्याने सुरू राहतील असे त्यांनी यावेळी सांगितले.


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे