आपल खान्देश

Pachora Police | पोलीस नाईक हरीश गवळी यांनी दाखवलेली तत्परता, प्रामाणिकपणा कामातली चिकाटी..


पाचोरा ठाण्यातले पोलीस नाईक हरीश गवळी यांनी दाखवलेली तत्परता,  प्रामाणिकपणा व कामातली चिकाटी ही पोलीस सेवेतील आदर्श उदाहरण ठरले असून पोलिस दलाच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

पाचोरा बस स्थानक परिसरात एका महिलेची पर्स हरवल्याची घटना घडली होती. सदर पर्समध्ये सुमारे दोन तोळ्याची मौल्यवान सोन्याची पोत, रोख २,००० रुपये व महत्त्वाची कागदपत्रे होती. पर्स हरवल्याचे लक्षात येताच संबंधित महिला प्रचंड चिंतेत सापडली असताना तिने पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस नाईक हरीश गवळी यांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली.

फिर्यादी महिलेच्या सांगण्यावरून संबंधित बस, प्रवासाचा मार्ग तसेच बस स्थानक परिसरात पोलीस नाईक गवळी यांनी सुमारे एक तास अत्यंत कसून व शिस्तबद्ध चौकशी केली. बसमधील प्रवासी, वाहक, चालक तसेच परिसरातील नागरिकांकडे बारकाईने विचारपूस करण्यात आली. कोणतीही घाई न करता अनुभव, निरीक्षणशक्ती व कर्तव्यभावनेच्या जोरावर तपास पुढे नेण्यात आला.

संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अखेर तपासाला यश मिळाले असून हरवलेली पर्स मिळून आली. पर्समधील दोन तोळ्याची सोन्याची पोत व रोख रक्कम सुरक्षित अवस्थेत आढळून आली. आवश्यक खातरजमा केल्यानंतर सदर पर्स व सर्व मौल्यवान साहित्य फिर्यादी महिलेच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.

पोलीस नाईक हरीश गवळी यांनी दाखवलेली तत्परता, प्रामाणिकपणा व चिकाटी ही पोलीस सेवेतील आदर्श उदाहरण ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी ही कामगिरी असून त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल फिर्यादी महिलेसह परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिस दलाच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे