आपल खान्देशब्रेकिंग

पाचोरा शहरातील एम एम कॉलज चौकात मोटरसायकलींची समोरासमोर धडक, एक जागीच ठार..!

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील एम एम कॉलेज चौकात दोन मोटरसायकलींच्या अपघातात एक इसम जागीच ठार झाला तर या अपघातात दोन व्यक्ती जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे.

शहरातील भडगाव रोडवरील एम एम कॉलेज चौकात आज संध्यकाळी 5 वाजेच्या सुमारास दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात संजय रतन पाटील (वय – ५८) रा. कोठली ता. भडगाव जि जळगाव यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, या अपघातात नाना सुखदेव बोबडे ( वय – ५८ रा. कोठली ता. भडगाव) व इम्रान खान (वय ३७ रा. भडगाव ) हे दोन जण जखमी झाले असुन त्यांचेवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहे.

मयत संजय पाटील यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले असा परिवार असुन गेल्या ३ महिन्यांपूर्वी त्यांचे हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या अपघाती निधनाने कोठली परिसरावर शोककळा पसरली आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे