आपल खान्देश
प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपचे उमेदवार सूरज वाघ विजयी झाले

पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेना उमदेवार अँड योगेश पाटिल ह्यांचा अवघ्या 22 मतांनी निसटता पराभव झाला, भाजपचे उमेदवार सूरज वाघ विजयी झाले या वॉर्डात शिवसेना उमदेवार जयश्री पाटिल यांनी भाजपच्या उमेदवार सीमा पाटिल यांच्यावर मात करून शिवसेनेने विजय खेचून आणला.
गढ आला पण सिह गेला अशी परिस्थिती असताना शिवसेना उमेदवार अँड योगेश पाटिल (दादू वकील) “हारने वालेको बाजीगर कहते है” ह्या हिंदी डायलॉग प्रमाणे दादू वकील ‘बाजीगर’ ठरतील आमदार किशोर आप्पा पाटिल ह्यांना न्याय देतील अशी अपेक्षा ठेवणे वावगे ठरणार नाही.
नगरसेवक सुरज संजय वाघ ह्यांनी पहिल्यांदा निवडणुक लढवली आणि त्यात ते यशस्वी झाले प्रभाग क्रमांक 10 मध्ये ते जायंट किलर ठरले. आता प्रभाग क्रमांक दहाचा राहिलेला विकास भाजप आणि शिवसेना करतील अशी अपेक्षा आहे.



