आपल खान्देश

आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते मुकुंद सपकाळे यांना महात्मा फुले समता पुरस्काराने गौरविण्यात आले


झूम मराठी वृत्त

जळगाव : सर्वसामान्य वंचित समुहांच्या न्याय हक्कासाठी लढणारे आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते मुकुंद सपकाळे यांना महात्मा फुले समता शिक्षक परिषदेने महात्मा फुले समता पुरस्कार देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील नानासाहेब प्रताप हरी पाटील जिल्हा बँकेचे संचालक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षणाधिकारी विकास पाटील,महात्मा फुले समता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ, डायट चे प्राचार्य डॉ. अनिल झोपे,सिव्हील राईट प्रोटेक्शन‌ सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद जीवने, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण,रविकिरण बिऱ्हाडे,डॉ.सत्यजित साळवे,विश्वास पाटील,शैलेश दखणे, खलिल शेख,मुकुंद नन्नवरे,अनिल सुरळकर आदी उपस्थित होते.

महात्मा फुले समता परिषदेचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ यांनी प्रास्ताविक करताना सत्यशोधक विचारांवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्याचा संघटनेचा उद्देश स्पष्ट केला. 

पुरस्कार्थी मुकुंद सपकाळे मागील चार दशकांपासून शोषित वंचित घटकांसाठी आवाज उठवत असून विद्यार्थी दशेपासुनच आंबेडकरी विचारांच्या मार्गावर चालत अनेक आंदोलनातून सामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढत आहेत. त्यांना मिळालेला पुरस्कार हा लढाऊ योध्याचा खरा सन्मान असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. सूत्रसंचालन श्रीमती रावलाणी यांनी तर आभार रणजित सोनवणे यांनी मानले.कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे