आपल खान्देश

पत्रकारांच्या पुढाकारात पाचोरा पत्रकार बांधवांच्या वतीने पोलीस बांधव व रुग्णवाहिका चालकांचा सत्कार..


पाचोरा | झूम मराठी ऑनलाईन @ दिलीप परदेशी

पाचोरा पोलीस स्टेशन येथे पाचोरा येथील पत्रकार बांधव तसेच ‘व्हाईस ऑफ मीडियाच्या’ पदाधिकाऱ्यांच्या वतीने रुग्णवाहिका चालक व पोलिसांचा सत्कार सन्मान करण्यात आला आहे.

पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात रुजू असलेले पोलीस कर्मचारी शकील शेख यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक देवुन 26 जानेवारी 2025 रोजी जळगाव येथे गौरविण्यात आले होते. त्याचबरोबर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी रणजित पाटील व सचिन भाऊ पवार यांना पदोन्नती मिळाल्याने त्याचबरोबर तसेच मागील आठवड्यात 22 जानेवारी 2025 रोजी झालेल्या जळगाव पाचोरा दरम्यान रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या इसमाना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून नेपाळ येथे त्यांच्या घरी व्यवस्थित पोहचून उत्कृष्ट काम केले होते. या अनुषंगाने पाचोरा मीडिया क्लब मीडिया यांच्या माध्यमातून पाचोरा पोलीस स्टेशन येथे छोटेखानी सत्कार करण्यात आला. तसेच रेल्वे अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पाचोरा येथील रुग्णवाहिका चालकांनी खूप चांगले काम केल्याबद्दल त्यांचे देखील प्राथमिक स्वरूपात रुग्णवाहिका चालक बबलू मराठे,अमोल पाटील,भागवत पाटील, सागर पाटील(गोलू) यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे.

समाजातील प्रत्येक व्यक्तीचे योगदान हे मोलाचे आहे आणि कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तीचा गौरव देखील झाला पाहिजे म्हणून या अनुषंगाने व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शेलकर, पोलीस टाइम्सचे जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले,मधुर खान्देशचे संपादक राहुल महाजन, तालुका सचिव रवी शंकर पांडे, पाचोरा शहराध्यक्ष प्रवीण बोरसे उपाध्यक्ष निखिल भाऊ मोर, सहसचिव दिलीप परदेशी, सचिव जावेद भाऊ शेख, सहसचिव नरसिंह भुरे, दिलीप चौधरी लोहारा त्याच बरोबर इतर पत्रकार बांधव यांच्यासह पोलीस निरीक्षक अशोक पवार,सहा.पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे,उपनिरीक्षक परशुराम दळवी, चव्हाणके साहेब तसेच पोलीस कर्मचारी मल्हार देशमुख, वसीम शेख,सचिन पवार त्याच बरोबर आदी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे