महाराष्ट्र

नोकरीचे आमिष दाखवून महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप!

झू म

नवी मुंबई :- नवी मुंबईच्या नेरुळ येथील डी.वाय.पाटील संस्थेत कामाला लावण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांनी पकडून चोप दिला आहे. प्रेम चव्हाण असं या नराधमाचे नाव आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला चांगलेच चोपले.

नेरुळ येथील डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये एका गरजु महिलेने नोकरीसाठी अर्ज केला होता. या नोकरीच्या बदल्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. सुरुवातीला या महिलेने प्रतिसाद न दिल्यामुळे हा व्यक्ती वारंवार पीडित महिलेला फोन करुन, माझी पत्नी नसल्यामुळे शरीरसुखासाठी दबाव टाकायला लागला. पीडित महिलेला आरोपीने शरीरसुखाच्या मोबदल्यात स्वीय सहाय्यक म्हणून नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. या नराधमाविरोधात एका महिलेने या विरोधात मनसेच्या बाळसाहेब शिंदे यांच्याकडे तक्रार केली.

संच या पीडित महिलेला स्विय सहाय्यक म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून वाशी येथील लॉजमध्ये बोलवले. यावेळी हा नराधम लॉजमध्ये आला असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला रंगेहाथ पकडले. त्याला लॉजमधून बाहेर आणले आणि चांगलाच चोप दिला. त्याने आपण मुलीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे कबूल केले. यानंतर मनसे सैनिकांनी या प्रेम चव्हाणाला नवी मुंबई पोलिसांना बोलवून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे