आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

भाजपच्या माजी नगरसेवकावर टोळक्याचा गोळीबार, उपचारादरम्यान बाळू मोरे यांचे निधन,चाळीसगाव हादरलं

राज्यातील कायदा सुव्यस्था ढासळली असल्याचे दाखवून देणाऱ्या घटना घडत आहेत. आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाइव्ह चालू असताना गोळीबार करण्यात आला. जळगावात तीन दिवसांपूर्वी टोळक्याने भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार केला होता.या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक बाळू मोरे यांचे उपचार सुरू असतांना निधन झाले आहे.

चाळीसगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या ५ जणांनी कट्ट्यातून फायरिंग करत जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली होती. यात बाळू मोरे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ५ हल्लेखोर आणि कट रचनारे २ असे एकुण ७ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. 

सदर घटना घडताच माजी नगरसेवक बाळू मोरे यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र आज उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. चाळीसगाव पोलीस स्थानकाच सहायक पोलीस निरिक्षक विशाल टकले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे