आज कृष्णकुंज वरून राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी शिवतीर्थावर अत्यन्त जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या साक्षीने गृहप्रवेश केला, राज ठाकरे हे स्वतः कलावंत असल्यामुळे त्यांनी आपल्या अनोख्या स्टाईल ने हे शिवतीर्थ सजविले आहे ज्याचे दर्शनच शिवाजी महाराजाना समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला पत्राद्वारे होतो ( ही अप्रतिम पत्र कलाकृती श्री अनुप चिटणीस यांनी तयार केलेली आहे) तर त्याच्या अगदी समोर एक पेंटिंग आहे ज्यात श्री प्रबोधनकार ठाकरे ,बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांची रेखाटने आहेत .( ही श्री विजय राऊत यांनी कॅनव्हासवर तयार केलेली कलाकृती आहे) .एक बाजूला शिवाजी महाराजांचे एक भव्य ऑइल कलर मधले पेंटिंग आहे( हे श्री वासुदेव कामत याचे ऑइल पेंटिंग आहे) तर दुसऱ्या बाजूला 1945व 2021 सालातले शिवाजीपार्क आहे …बाजूला राज ठाकरे यांनी आजवर जोपासलेली पुस्तके आणि फिल्म सीडीज चे संग्रहालय आहे अगदी वेगक्या थाटात आणि यात पण एक पेंटिंग आहे किंगडम नावाचे ज्यात मध जमा करीत असलेल्या मधमाश्या आहेत ( ही कलाकृती श्री विजय राऊत यांनी तयार केली आहे ) .पाचव्या मजल्यावर वॉल्ट डिजनी यांच्या कलाकृतींचा संग्रह आहे आणि समोर भव्य दिव्य टेरेस .व्वाव समोर जे दिसते त्यावर विश्वास बसनार नाही असा शिवाजी पार्क चा नजारा आहे….या संपूर्ण वास्तूचे पूर्ण वर्णन करणार नाही कारण जे आहे ते खरोखर अवर्णनीयच आहे थोडक्यात राज ठाकरे यांच्या स्वप्नातील हा एक यूरोपीय प्रभाव असलेला भव्य दिव्य शिवतीर्थ नावाचा राजवाडा आहे
.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा