पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत शेतमाल तारण कर्ज योजना
पाचोरा-भडगांव विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसनिमित्ताने 01 नोव्हेंबर शनिवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे शिवसेना-युवासेना निर्धार मेळावा आणि शेतमाल तारण कर्ज योजना 2025-2026 या महत्त्वाच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी दिलासा.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधूनपाचोरा येथे शिवसेना-युवासेना निर्धार मेळावा आणि शेतमाल तारण कर्ज योजना उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील व सर्व संचालक उपस्थित होते हे उपस्थित होते.
घसरत्या बाजारभावात शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत मूग, उडीद, सोयाबीन, थान (भात), तुर, सूर्यफुल, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, चणा, हळद व कानुषी या पिकांचा समावेश आहे. शेतमालाच्या चालू बाजारभाव किंवा आधारभूत किमतींपैकी जी किंमत कमी असेल, त्या किमतीच्या 70% पर्यंत तारण कर्ज मिळणार असून, केवळ 6% व्याजदराने 6 महिन्यांच्या (180 दिवसांच्या) कालावधीसाठी कर्ज उपलब्ध राहील. याशिवाय बखार पावतीवरही कर्ज मिळणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे. बखार महामंडळ पाचोरा येथील शेतीमाल तारण पावतीसाठी चालू पिकाचा सातबारा उतारा 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर, आधार कार्ड, बँक पासबुक यांच्या झेरॉक्स प्रती २ पासपोर्ट साईज फोटो आवश्यक असून या योजनेबाबत अधिक माहितीसाठी पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधावा.
- काय आहे ही योजना ..
शेतमाल तारण योजना ही एक सरकारी योजना आहे जी शेतकऱ्यांना शेतीमाल तारण ठेवून कर्ज घेण्यास मदत करते. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना काढणीच्या हंगामात कमी दराने शेतमाल न विकता, त्यांना बाजारातील योग्य किंमत मिळेपर्यंत तारणावर कर्ज उपलब्ध करून देणे आहे. या योजनेअंतर्गत ६ महिन्यांसाठी ६% व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. या योजनेत केवळ शेतकऱ्यांचा माल स्वीकारला जातो, व्यापाऱ्यांचा नाही.



