आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

कुसूंब्यात भाजपच्या विकास कामांचा बॅनर अज्ञातांनी फाडले.

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

कुसुंबा (झूम मराठी) कुसुंबा जिल्हा परिषद गटातील विकासकामांचे बॅनर जि.प सदस्य संग्राम पाटील व सदस्य  रितेश परदेशी  यांच्या विकास कामांचा बॅनर कुसुंबा बस स्थानक आवारात लावण्यात आले होते सदर विकास कामांचा बॅनर काल रात्री काही अज्ञातांनी फाडून टाकला असून त्यावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते व पदाधिकारीनीं संताप व्यक्त केला. जि. प सदस्य संग्राम पाटील व पं स सदस्य  रितेश परदेशी यांनी पदाधिकारीनां शांत राहण्याचे आवाहन केले आहॆ.

कुसुंबा जिल्हा परिषद गटातील विकासकामांचे बॅनर जि.प सदस्य संग्राम पाटील व सदस्य  रितेश परदेशी हे भाजप पक्षाचे असल्यामुळे त्या बॅनरवर भाजपच्या बड्या नेत्यांचे फोटो देखील होते. बॅनर फलकावर जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील विकास कामांचा सोबत मंजूर विकास कामाचे फलक लावले होते. अज्ञातांनी ते फाडल्याचे दिसून आले रात्री घडलेला प्रकार सकाळी उघडकीस आला. तेथील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संताप व्यक्त केला असून त्या प्रकाराबद्दल ग्रामस्थांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे