ब्रेकिंग

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लासगावात रक्तदान


पाचोरा टुडे | पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 30 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर पार पडले. जि.प.मराठी शाळेत इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर पार पाडले. दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी स्वतः या रक्तदान शिबिराला हजेरी लावली. यावेळी केक कापून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात माजी जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांच्यासह 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. उल्हास तासखेडकर, अनिल भोळे, दिक्षा कांबळे, रवींद्र जाधव, मंगेश ओतारी, आमीर शहा आणि ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

रक्तदान शिबिर प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेनेचे किरण पाटील, डॉ. प्रदीप पाटील, विजय बापू पाटील, ग्रामपंचायतचे सरपंच वहिद देशमुख, ग्रामसेवक अनिल पगारे, उपसरपंच, सदस्य तसेच माजी सरपंच-उपसरपंच आणि सदस्य, पोलीस पाटील पंजाबसिंग पाटील, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक अहिरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. उल्हास तासखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लासगावातील रक्तदान शिबिरात 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याचे गटनिहाय वर्गीकरण करून रक्ताच्या सर्व तपासण्या केल्या जातील आणि त्यांना ब्लड बँकेत ठेवण्यात येईल.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे