Kusumba | रितेश परदेशी यांची भाजपा धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हाउपाध्यक्षपदी नियुक्ती
धुळे भारतीय जनता पार्टी (धुळे ग्रामीण) आयोजित दीपावली स्नेह मेळाव्यात कुसुंबा येथील मा. पं. स. सदस्य रितेश परदेशी यांची भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली हा कार्यक्रम धुळे येथील हिरे भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
धुळे जिल्ह्यातील कुसूंबागाव हे राजकीय केंद्र बिंदू ठरते भाजपाचा तरुण चेहरा रितेश परदेशी यांच्याकडे पहिले जाते कमी वयात पंचायत समिती सदस्य बनलेले रितेश परदेशी हे पहिलेच व्यक्ती आहेत, राजकीय पकड मजबूत असून त्यांना भारतीय जनता पक्षाने धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त केल्याने येत्या निवडणुकीत पक्षाची चांगली धुरा सांभाळतील असा विश्वास व्यक्त होत आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री मा.ना. जयकुमार भाऊ रावल, भाजपा प्रदेश संघटनमंत्री विजय चौधरी, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष बाबा भामरे, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार कुणाल बाबा पाटील, भाजपा प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष ग्रामीण रामकृष्ण खलाणे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपाळकर, भाजपा शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ.आरतीताई पवार, माजी जि. प. सभापती प्रा.अरविंद जाधव, जि.प.सदस्य संग्राम पाटील, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब भदाणे, बोरकुंड,भाजप जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले उपस्थित होते.




