आपल खान्देश

पाचोरा नगर पालिका वॉर्ड क्रमांक एक मधून नंदू शेलार इच्छुक, नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व्यक्तीमत्व…

पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद हे महिला राखीव झाले असल्यामुळे आगामी निवडणूकीसाठी शहरातील सर्वच इच्छूक उमेदवार आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. त्यातच प्रभाग क्रमांक 01 ची निवडणुक म्हणजेच हाय व्होल्टेज असते त्याच प्रभागातून नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले नंदु शेलार हे निवडणुक लढणार आहेत अशी माहिती देण्यात आली.

पाचोरा नगरपालिका निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे निवडणूकी चे कधीही बिगुल वाजू शकतं असे म्हटले जात आहे. पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा प्रतिष्ठान पणाला लावणारा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक एक होय त्या प्रभागातुन शिवसेनेने उमेदवाराची नुकतीच घोषणा केली असून ही निवडणुक महायुतीतील घटक पक्ष भाजपा आणि शिवसेना स्वबळावर लढणार आहेत अशातच प्रभाग क्रमांक एक मधून सामाजिक कार्यकर्ते  म्हणून ओळख असलेले नंदू शेलार हे  ईच्छुक असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमातून सांगितली आहे. दिवाळीत त्यांनी घरोघरी जाऊन भेट घेतली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असे त्यांनी सांगितले.

कुठलाच राजकीय वारसा नसलेले व्यक्ती म्हणजे नंदू शेलार होय सामाज सेवेची आवड असलेले नंदू शेलार यांनी करोना कोविड 19 च्या महामारीत त्यांचे काम लक्षात घेण्यासारखं आहे, नंदू शेलार फाउंडेशन च्या माध्यमातून शहरात सामाजउपयोगी उपक्रम राबण्यात येतात, पाचोरा शहरात ते नेहमी क्रिकेट मॅचेस भरवतात नंदू शेलार फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब खेडाळूला मोफत प्रशिक्षण दिलं जात, रस्त्यावरील गरीब असो वा सर्वसामान्य कोणी त्याला मदत करतात,  शहरात वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मार्फत मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात येतात त्यांना सामाज सेवेचीआवड असून ते कधीही मदतीला धावून येतात.

पाचोरा नगरपालिका वॉर्ड क्रमांक एक मधून आमच्या हक्काचा उमेदवार निवडून येईल, ही खात्री आहे,” असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला. संवाद साधतानां नंदू शेलार यांनी सांगितले. “नागरिकांचा मिळालेला प्रेमळ प्रतिसाद आणि विश्वास हाच आमच्या निर्णयाचा पाया आहे. माझी उमेदवारी करण्यामागे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणे हेच मुख्य ध्येय आहे. शहराच्या विकासासाठी आणि सामाजिक न्यायासाठी मी निश्चयाने कार्य करणार त्यात विशेष बाब नमूद केली की, राजकीय पक्षाकडून तिकीट मिळाले तर ठीक नाही तर अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरणार असे सांगितले आहे.

प्रभाग क्रमांक एक मधून दिग्गज प्रतिस्पर्धी उमेदवारां विरोधात ते कश्या प्रकारे निवडणुक लढतात हे येणारे काळ ठरवेल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे