क्रिडा व मनोरंजन
Video | लहानग्यांची कुस्ती जबरदस्त, मजेदार व्हिडीओ व्हायरल
झूम मराठी न्यूज मीडिया टीम
सदर ट्विट व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटा पळ काढताना दिसत आहे. मात्र दुसरा छोटा मुलगा पळून जात असलेल्या लहानग्याच्या मागे लागला आहे. तो पळून जात असलेल्या मुलाला माझ्यासोबत कुस्ती खेळ असे म्हणत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. तसेच काही नेटऱ्यांनी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या असून त्याला लाईकसुद्धा केले आहे. सध्या हा व्हिडीओ तुम्हाला ट्विटरवर पाहता येईल.
पाहा व्हिडीओ
व्वा रे पठ्ठेहो.. हेच ते भारताचे पुढचे हिंदकेसरी#wrestling | #ViralVideo | #ViralVideo pic.twitter.com/v8yZe6GYvR
— prajwal dhage (@prajwaldhage100) October 23, 2021
व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या व्हिडीओमध्ये दोन छोटी मुलं कुस्ती खेळताना दिसत आहेत. ही मुलं एकमेकांना खाली पडत आहेत. कुस्तीचे मैदान नसले तरी ही छोटी मुलं रस्त्यावरच मजेत एकमेकांना जमिनीवर पाडत आहेत. त्यांच्यामध्ये चढाओढ लागली आहे. हा व्हिडीओ चांगलाच मजेदार असून दोन मुलं आनंदात कुस्ती खेळताना दिसत आहेत.

