आपल खान्देश
Pachora | हिवरा नदीत वाहून गेलेल्या तरुणीचा मृतदेह ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग.
बचावकार्यामुळे तरुणीचा मृतदेह शोधण्यात यश आले.
जळगावमधील पाचोरा तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका तरुणीचा मृतदेह शोधण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर, स्थानिक बचाव विभागाने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने तिचा मृतदेह शोधला.
पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृष्श पाऊस पडल्याने वडगाव टेक येथील नदीला पूर आल्यानंतर निकिता भालेराव नावाची तरुणी वाहून गेली होती. तिचा मृतदेह शोधण्यासाठी तीन दिवस बचावकार्य सुरू होते. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिचा मृतदेह पुराच्या पाण्यात स्पष्टपणे दिसला, ज्यामुळे तो बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली.


