दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस ड्रायव्हरने अत्याचार…
दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस ड्रायव्हरने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्हातील पाचोरा तालुक्यातून समोर आली आहे. संशयीत आरोपी हुसेन शेख जलील, राहणार शेंदुर्णी, असे 38 वर्षीय आरोपी बस चालकाचे नाव आहे. पाचोरा तालुक्यातील एका गावातील काही विद्यार्थी शिक्षणासाठी शेंदुर्णी तालुका जामनेर येथे स्कूल बसने ये-जा करतात. गेल्या महिन्यात संशयीत स्कूल बसचा चालक अबिद हुसेन शेख हा दुचाकीने संबंधित मुलीच्या गावात आला होता. तेव्हा ही मुलगी बाहेर जात असताना अबीद तिला ‘तू मला आवडतेस’ असं म्हणाला. त्यानंतर तिचा पाठलाग करत त्याने मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी पोलिसातील फिर्याद केला आहे.
पालक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी स्कूल बसचा आधार घेतात, ड्रायव्हरवर विश्वास ठेवतात, मात्र हाच स्कूल बसचा ड्रायव्हर विश्वासघातकी निघाला. संशयीत आरोपी अबिद हुसेन शेख जलील, वय 38, राहणार शेंदुर्णी, याने त्याच्याच बसमधील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. या नराधमाच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पाचोरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलीने गुरुवारी पुरवणी जबाब दिला. त्यात म्हटले आहे, की बस चालकाने माझ्यावर माळेगाव, तालुका जामनेर, येथील शेतात नेऊन बलात्कार केला. आरोपी हा मुलीला फोनवरुन वारंवार धमकावत असे आणि अश्लील भाषेत बोलत छळ करत असे. संबंधित गावातून दररोज 50 ते 60 विद्यार्थी-विद्यार्थिनी स्कूल बस ने ये-जा करतात. त्यामुळे बस चालकाने याआधी इतर कोणासोबतही गैरवर्तन केले आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.



