महाराष्ट्रराजकीय

प्रिय कब्बू…’, पूर्वाश्रमीच्या पतीनं शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सुषमा अंधारेंची लेकीच्या नावानं फेसबुक पोस्ट

सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर अंधारे यांनी डॉ बाबासाहेबांच्या ओळींचा संदर्भ देत अंधारे यांनी ही पोस्ट लिहिली आहे.

प्रिय कब्बु…..

तू फक्त 45 दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं.. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता. 

पण अख्ख कुटुंब पाठीशी उभा राहिलं.. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलुन मी आल्या पावली घारी सारखी तुझ्याकडे झेपावले. 

बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तूझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..! 

 तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात,.  

बाबासाहेब लिहितात, ” जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत. त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील.

 पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील..! 

भय , भ्रम , चरित्र हत्या हि मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा ” _ डॉ बाबासाहेब आंबेडकर 

  #आई #लढा

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे