राष्ट्रीय जनमंच पक्षाची, जळगाव जिल्हा आढावा बैठक..
- झूम ऑनलाईन न्यूज @ दिलीप परदेशी
चाळीसगाव | आगामी ग्रामपंचायत असो की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महानगरपालिका व नगरपालिका यासह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेऊन राष्ट्रीय जनमंच पक्षाची जळगाव जिल्हा आढावा बैठक शासकीय विश्रामगृह, चाळीसगावात संपन्न झाली.
राष्ट्रीय जनमंच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदिपदादा लांडगे आणि प्रदेश प्रभारी संघटक देविदास वाघ हे या बैठकीस मार्गदर्शक म्हणुन उपस्थीत होते.या जिल्हास्तरीय बैठकीत स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठविणे, सामान्यांसाठी संघर्ष करणे याबरोबरच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महानगरपालिका सह नगरपालिकांच्या होणा-या निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या दष्टीने जास्तीत जास्त उमेद्वार उभे करणे, पक्ष संघटन मजबुत करणे या विषयावर चर्चा झाली.
तसेच पक्ष संघटनेचा एक भाग म्हणुन काही पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. या बैठकीत अंतरराष्ट्रीय मानव अधिकार कार्यकर्ते मा.सुरेश अर्जुन वेळीस यांची चाळीसगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर वाघ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
राष्ट्रीय जनमंच पक्षाचे विचार, पक्षाचे धोरण घराघरात पोहोचवण्यासाठी काम करेन आणि तालुक्यात संघटनात्मक मजबुती वाढवून चाळीसगाव तालुक्यात एक नंबर चा पक्ष बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत करेल असे आश्वासन नूतन तालुका अध्यक्ष सुरेश अर्जुन वेळीस यांनी दिले. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीपदादा लांडगे, प्रदेश प्रभारी संघटक देविदास वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास हटकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पक्षाचे चाळीसगाव शहर उपाध्यक्ष शंकर सोनार, शहर सचिव सचिन शेटे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य सदस्य नारायण कुमावत, राजेंद्र चींधा खेडकर, सुनील सूर्यवंशी वगैरे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



