आपल खान्देशकृषीवार्ता

येत्या शुक्रवारी जळगावात कृषी उद्योजकता व नाविन्यता परिषद

झूम न्यूज नेटवर्क

जळगाव (झूम मराठी) जिल्ह्यातील शेतकरी व महिला युवक या घटकांना स्वयंपूर्ण करणे व त्या क्षेत्रांना चालना देण्यासाठी कृषी उद्योजकता व नाविन्यता परिषदचे येत्या शुक्रवार दिनांक 13 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आयोजन करण्यात आले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारतासाठी स्वयंरोजगारातून समृद्धीकडे केंद्र सरकारच्या विविध योजनांतून एक पाऊल टाकण्यात आले आहे. खरंतर जनता आणि सरकारमध्ये लोकप्रतिनिधी या नात्याने एक दुवा म्हणून काम करत असताना या योजना तळागाळापर्यंत पोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. जळगाव जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांच्या कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेत कृषी विभागाकडून संचलित होणाऱ्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न खाद्य अन्य योजना (PMFME), कृषी पायाभूत सुविधा (AIF), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम / प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP/PMEGP), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना (POCRA) या योजनांच्या यशस्वी लाभार्थ्यांचे अनुभव कथन / सादरीकरण होणार आहे. योजनांचे पात्रता, निकष, अंमलबजावणी, फलनिष्पत्ती याबाबत सविस्तर माहिती देण्यात येऊन शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी भरीव प्रयत्न करण्यात येत आहे.

कृषी उद्योजकता व नावीन्यता परिषद या कार्यशाळेला आपण उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. आपल्यातील उद्यमशील विचारांना चालना देण्यासाठी आपण या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे खासदार उन्मेष पाटील यानी प्रसार माध्यमाशी बोलतांना आवाहन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे