आपल खान्देशब्रेकिंग

Pachora News | पाचोरा शहरात अचानक बारा वर्षीय चिमुकली दगावली..

पाचोरा शहरातील पुंनगाव रोडवरील रेणुका कॉलनीत राहण्याऱ्या रमेश सदाशिव मिस्तरी यांची नात इशिता राकेश वाघ वय (12वर्षे) हिस अचानक चक्कर आली आणि खाली पडली तिला दवाखान्यात नेले असता मृत घोषित केल्याने नातेवाईकांनी तेथेच हंबडा फोडत आक्रोश केला या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाचोऱ्यात आजी आजोबांकडे राहणारी हसत खेळत असणारी इशिता ही नेहमी प्रमाणे सकाळी झोपेतून उठली आणि आई मला चक्कर येतेय.. म्हणत खाली कोसळली तिला त्वरित इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले नातेवाईकांनी तेथेच हंबडा फोडत आक्रोश केला या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

लहानपणीच मोठे स्वप्न बघणारी इशिता अवघ्या बाराव्या वर्षी जग सोडून गेल्याने आई, भाऊ, आजी, अजोबा आणि मामा यांना मोठा धक्का बसला आहे. इशिता ही पाचोरा शहरातील श्री गो से हायस्कूल मध्ये इयत्ता पाचवीत शिकत होती. इशिता ही पाचोऱ्यातील नंदू शेलार यांची भाची होती.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे