आपल खान्देश

नगरदेवळा ग्रुप ग्रामपंचायत वित्त आयोग निधीत केलेल्या भ्रष्टाचाराची आजवर झालेल्या चौकशी नुसार कार्यवाही केली नसल्याने उपोषणास बसणार!.

झूम मराठी वृत्त

नगरदेवळा (प्रतिनिधी) राज्यशासनाचा १४ व १५ वित्त आयोग निधीत केलेल्या भ्रष्टाचाराची आजवर झालेल्या चौकशी नुसार कार्यवाही केलेली नाही. चौकशी अहवाल पुरवण्यात येईल असे सांगीतले होते परंतु आजपावेतो चौकशी अहवाल मला देण्यात आलेला नाही व संबंधित महत्वपूर्ण विषयांबाबत कुठलीही कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली नाही. संबंधित भ्रष्टाचारा विरोधात कायदेशीर कार्यवाही न केल्यास मी दि. २६ जाने. २०२२ पासुन पंचायत समिती पाचोरा कार्यालयाच्या आवारात उपोषणास बसणार असे प्रसिद्धी माध्यमानां माहिती दिली.

ग्रामविकास अधिकारी श्री. संतोष शिवणेकर (नगरदेवळा ता.पाचोरा) यांनी १४ व १५ वि आयोग निधीत केलेल्या भ्रष्टाचाराची आजवर झालेल्या चौकशी नुसार कार्यवाही केलेली नाही. तसेच नगरदेवळा गृप ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणे नियमाकुल करणेसाठी मा. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या पत्राची दखल न घेता जाणुन बुजून सदरच्या महत्वपुर्ण ग्रुप ग्रामपंचायत नगरदेवळा येथील सदस्यांवर मुंबई प्रा.म.प.अधिनीयम १९५८ कलम १४ (ज.३) प्रमाणे तक्रार अर्ज दि. १८ मार्च २०२१ पासुन मा. जिल्हाधिकारी जळगांव सादर केला असुन मागील १० महिन्यापासुन चौकशी अहवाल जि.प. जळगांव तसेच पं.स.पाचोरा यांचे कडे प्रलंबीत आहे. असे माजी उपसरपंच विलास राजाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अर्जदार सामाजिक कार्यकर्ते विलास राजाराम पाटील यांचे म्हणणे असे की मी दि. ३०/१२/२०२१ रोजी तक्रारी अर्ज दिला आहे  तो अर्ज आपण कार्यवाहीसाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती पाचोरा यांचेकडे वर्ग केलेला असुन संबंधित अर्जाप्रमाणे मा. गटविकास अधिकारी यांनी मला लेखी पत्र दिलेले आहे की, आपण दिनांक ५/१/२०२२ पासुन उपोषणास बसु नये. आपणास दि. १३/१/२०२२ पर्यंत चौकशीचे कामकाज पूर्ण येईल, असे पत्र दि. ३/१/२०२२ रोजी दिलेले आहे. त्यानुसार मी दि.५/१/२०२२ रोजी गटविकास अधिकारी पं.स.पाचोरा यांच्या विनंतीस मान देऊन उपोषणास बसलो नाही. परंतु मला दि. १३/१/२०२२ रोजी चौकशी अहवाल आपणास पुरवण्यात येईल असे सांगीतले होते परंतु आजपावेतो चौकशी अहवाल मला देण्यात “आलेला नाही व संबंधित महत्वपूर्ण विषयांबाबत कुठलीही कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली नाही. म्हणुन दि. २५/१/२०२२ रोजी पर्यंत आपल्याकडील चौकशी अहवाल न मिळाल्यास व संबंधित महत्वपुर्ण विषयांबायत कुठलीही कायदेशीर कार्यवाही न केल्यास मी दि. २६ जाने. २०२२ पासुन पंचायत समिती पाचोरा कार्यालयाच्या आवारात उपोषणास बसणार आहे असे प्रसिद्धी माध्यमानां दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे