आपल खान्देशसखी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियात्रिकी सेवा सहाय्यक पदाच्या परीक्षेत राज्यात 14 व्या रॅकने उत्तीर्ण, जिद्दीने रचला इतिहास; पूजा गढरी चा प्रेरणादायी प्रवास…

झूम मराठी ऑनलाईन @ दिलीप परदेशी 

धुळ्याच्या पूजा गणेश गढरी हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियात्रिकी सेवा अभियंता सहाय्यक पदाच्या परीक्षेत राज्यात 14 व्या क्रमांकावर येऊन घवघवीत यश मिळवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण कुसूंबा गावातील पहिल्या महिला ठरल्या.

धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील गणेश झुपरू गढरी हे धुळ्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असून  आई-वडील सुशिक्षित असल्याने पुजा गढरी वर लहानपणापासूनच शिक्षणाचे संस्कार झाले. कमलाबाई गर्ल स्कूलमधून १०वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर  जयहिंद कॉलज मध्ये बारावी झाली आणि धुळ्याच्या एस. एस. व्ही पी. एस. कॉलज मध्ये उच्च शिक्षण सुरु केले.

पुजाने सुरुवातीपासूनच शिक्षण घेऊन उंच भरारी घेण्याची  खूणगाठ बांधत  पदवीचे शिक्षण घेतले. या दरम्यान आईने ही आपल्या मुलीच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. खासगी क्लासचीही मदत घेत,  चिकाटीने अभ्यासाला लागली होती  दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियात्रिकी सेवा अभियंता सहाय्यक  परीक्षेला सामोऱ्या गेली. या निकालाची त्यांच्यासह आई-वडिलांना प्रचंड उत्सुकता होती. निकालात यश मिळण्याचा विश्वास होता, मात्र तरीही हूरहूर होती. मात्र निकाल राज्यात 14 व्या क्रमांकावर लागल्याने पूजा सह आई वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

पुजाचे हे यश आई-वडिलांचा समर्पित पाठिंबा आणि अभ्यासात मेहनत घेतल्यामुळे हे यश शक्य झाल, पूजा गणेश गढरी हिला झूम मराठी मीडिया, झूम मराठी लाईव्ह परिवाराकडून शुभेच्छा…

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे