आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर, शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनास यश… शुभांगी पाटील

राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांवरील शिक्षकांना पुढील 20 टक्क्याच्या अनुदानाची तोंडी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी काल आझाद मैदान मुंबई येथे केली.  राज्यातील सुमारे 64 हजार विनाअनुदानित वंशतः अनुदानित शिक्षकांचे अनुदानाच्या पुढील टप्प्यासाठी गेल्या सहा जून पासून आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी मिळून स्थापन केलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन सुरू होते. या आंदोलनास दिनांक आठ व नऊ जुलै रोजी शिक्षकांनी राज्यातील शाळा बंद ची हात देत आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने उपस्थिती दिल्यामुळे आंदोलनाची धार तीव्र झाली होती.

राज्यातून सुमारे 40 ते 50 हजार शिक्षक गेल्या दोन दिवसांपासून भर पावसात आझाद मैदानावर ठाण मांडून बसले होते विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांची देखील संख्या लक्षणीय होती व त्यातच आंदोलकांनी रात्रभर आझाद मैदानावर बसून काढल्यानंतर राज्यभरात या आंदोलनाची मीडियाच्या माध्यमातून प्रचंड चर्चा झाली तरी सुद्धा सरकार मागण्या मान्य करत नव्हते म्हणून या आंदोलनात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना आझाद मैदानावर शिक्षकांसाठी यावे लागले यात प्रामुख्याने राज्याचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार तसेच शिवसेना राज्य उपनेते तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या विनंतीवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शिवसेना नेते खा. अनिल देसाई, तसेच खा.अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, आमदार मिलिंद नार्वेकर तसेच शिवसेना उ. बा .ठा. पक्षाचे अनेक नेते आमदार खासदार यांनी सक्रियपणे पाठिंबा देत हा प्रश्न सदनात लावून धरला. त्याचप्रमाणे खा सुप्रियाताई सुळे, आ रोहित पवार, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस जयंत पाटील, माजी आमदार अशोक धात्रक तसेच शिक्षक व पदवीधर आमदारांनी सदर आंदोलनात सहभाग घेऊन आंदोलनाची धार वाढविली. 

अखेर सरकारला सदर आंदोलनाची दखल घेत शिक्षकांची मागणी मान्य करावी लागली व काल दिनांक १०/०७/२०२५ रोजी शासनाचे प्रतिनिधी म्हणून सत्ताधारी पक्षाचे मंत्री ना गिरीश महाजन यांनी स्वतः आझाद मैदान मुंबई येथे येऊन आंदोलकांची भेट घेत येत्या 18 तारखेपर्यंत अधिवेशन संपण्यापर्यंत शिक्षकांच्या पुढील 20% अनुदानासाठी वेगवेगळ्या खात्यातून निधी मिळवून निधीची तरतूद करण्यात येईल व शिक्षकांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्यात येईल असे तोंडी घोषणा केल्यानंतर मा. मंत्री महोदयांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत शिक्षकांनी मागील सुमारे एक महिन्यापासून सुरू असलेले आंदोलन स्थगित केले.

या निर्णयामुळे राज्यातील सुमारे साठ हजार शिक्षकांना पुढील 20% अनुदानाचा टप्पा मिळणार आहे व त्यामुळे त्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही त्यांना 20 टक्के यांना 20 टक्के मिळाले त्यांना 40 टक्के व ज्यांना 40 टक्के मिळाले त्यांना 60 टक्के व ज्यांना 60 टक्के अनुदान मिळाले अशा शिक्षकांना 80% चा टप्पा मिळणार असल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याबद्दल शिक्षकांनी शिक्षक समन्वय संघाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे व शुभांगी ताई पाटील यांचे तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे