पाचोरा शहरात नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांचे मनसेच्यावतीने स्वागत करून दिले निवेदन..
- झूम मराठी ऑनलाईन
पाचोरा शहरात नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले आणि निवेदन देण्यात आले.
पाचोरा शहरातील नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अवजारे व पाळीव प्राणी चोरी प्रकरण संदर्भात निवेदन देऊन स्वागत करण्यात आले, काय आहे निवेदनात खाली वाचू यात…
वरील विषयास अनुसरून आम्ही विनंती करतो की पाचोरा तालुक्यात ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधवांची संबंधित अवजारे विहिरातील पाण्याची मोटर तसेच पाळीव प्राण्याची चोरीचे प्रमाण वाढले असून या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे शेतकरी बांधव तक्रार घेऊन आल्यास त्यास सन्मान जनक नामक मिळत नाही, शेतकऱ्यास प्रश्न विचारून आरोपीच्या पिंजल्यात उभे केले जाते अशा पोलिसांच्या वागणुकीमुळे शेतकरी बांधव हा परेशान झाल्याचे दिसून येते व त्याचा कायदा सुव्यवस्थेवरचा निश्वास उडत असल्याने निदर्शनास येते आपण पाचोरा पोलीस स्टेशन येथे नव्याने नियुक्त असल्याने आपण शेतकरी बांधवांना न्याय देऊन पाचोरा तालुक्यात व शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा अशी आशा अपेक्षा या निवेदनाच्या माध्यमातून माध्यमातून व्यक्त करीत आहोत.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम अशोक पाटील जिल्हा सरचिटणीस, ज्ञानेश्वर ठाकरे तालुकाध्यक्ष, ऋषिकेश भोई शहराध्यक्ष, जितेंद्र नाईक ता. सरचिटणीस, विध्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कृष्णा दूंदले, निलेश मराठे विद्यार्थी शहराध्यक्ष, वाल्मीक तालुका संघटक, अभिषेक बोरसे, जगताप वाहतुक सेना, चेतन मोरे, अजय ठाकूर, कुणाल मोरे, सोनू भोई, रतन गायकवाड, हितेश पाटील आदी मनसैनिक उपस्थित होते.



