रविवारची साप्ताहिक पिंपरी चिंचवड शहर तर्फे महिलांचा सत्कार
रविवारची साप्ताहिक पिंपरी चिंचवड शहर तर्फे महिलांचा सत्कार
पिपरी:- ( मोरवाडी ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेची दर रविवारची साप्ताहिक पुजा तर्फे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त सौ. जयश्री संजय सदगर ( लेखनिक जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे ) यांच्या हस्ते करण्यात आली दर रविवारची साप्ताहिक पुजा गेली सहा वर्षांपासून एकही रविवार न चुकता करोनाच्या काळात ही पुजा श्री दिपक भोजने यांच्या पुढाकाराने व समाज बांधवांच्या सहकार्याने होत होती शहरातील समाजबांधव एकत्र यावे उद्देशाने पुजेची सुरवात जुन २०१५ पासुन सुरू आहे पुजेच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात येतात जसे की महिला दिन , डाॅक्टर डे , नर्स डे , समाज बांधवांचे वाढदिवस , जयंती , पुण्यतिथी , त्रिपुरा पोर्णिमा , विजयादशमी व इतर सत्कार समारंभ आज शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी सौ सुजाता बंडगर , सौ. रेणुका भोजने , मल्हार आर्मीचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर केळे रासपचे गणेश खरात वंचित आघाडीचे उपाध्यक्ष बिरूदेव मोटे , विजय मानवर , अभिनेते पत्रकार राम दुधभाते , दादासाहेब कोपनर , गोर्वधन कांबळे शहाजी दन्ने , निलेश वाघमोडे , विनोद बरकडे , गोरख बंडगर , आशोक कांबळे , भारत घुटूकडे , पुण्याबा माने हणमंत वाक्षे , संजय वाक्षे, गणेश देवडकर, विठ्ठल माने, दिलीप लुबाळ, बिरा आनुसे, तानाजी कोळेकर , भाऊ मोटे व इतर समाज बांधव उपस्थित होते वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष देवेंद्र तायडेसाहेब यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक दिपक भोजने यांनी केले जयश्री सदगर यांनी मनोगत व्यक्त केले



