आपल खान्देशराजकीय

प्रियंका गांधी अटकेच्या निषेधात पाचोरा कांग्रेस आक्रमक

कॉग्रेस च्या प्रियंका गांधी अटकेचे पाचोर्यात पडसाद 

पाचोरा (प्रतिनिधी) :- उत्तर प्रदेशातील लखीमपुर मधील शेतकर्‍यांना चिरडले गेलेल्याने त्यांच्या परीवाराला सांत्वन करण्यासाठी जात असताना कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी अटकेच्या निषेधार्थ पाचोर्यात जोरदार निदर्शने केली

शेतकर्‍यांच्या जीवावर उठणारे तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे म्हणून उत्तर प्रदेश च्या लखीमपुर येथे शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते या आंदोलनात केंद्रीय मंत्री च्या मुलाने चार शेतकर्‍यांना चिरडले यात शहीद झालेल्या शेतकरी परीवाराला सांत्वन भेट देण्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी जात असतानांच त्यांना अटक करण्यात आली असून या भाजपा च्या योगी सरकार विरोधात पाचोरा कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. निदर्शनात ” योगी तेरी ताना शाही नहीं चलेगी नहीं चलेगी” ” जो किसान से टकरायेगा वह मिट्टी में मिल जायेगा,” प्रियंकाजी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, शेतकरी विरोधी काळे कायदे , रद्द झालेच पाहिजे ” अशा अनेक घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणले होते.यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांच्या सह तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅड. अंबादास गिरी, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता नेवे, तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शरीफ शेख, नाना पाटील, शंकर सोनवणे, शंकर धमाले, अनिल धमाले, योगेश धमाले, संतोष पाटील, शंकर महाजन, आबा महाले, रवी ठाकुर, अनिल भोई, भुषण पाटील आदींनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रांताधिकारी अधिकारी कार्यालय गेले असता .अव्वल कारकून रमेश मोरे . यांना निवेदन देण्यात आले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे