आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

School Start | पाचोऱ्यातील जय किरण शाळेच्या विध्यार्थ्यांचे औक्षण करून, फुलांचा वर्षाव आणि ढोल ताशाच्या गजरात शाळेत प्रवेश..

  • दिलीप जय परदेशी

राज्यातील शाळांना सुरुवात झालीय. पाचोरा शहरातील जयकिरण प्रभाजी संचालित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालयात 16 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून हसतमुख शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुलाबपुष्प तसेच फुलांचा वर्षाव करून ढोल ताशाच्या गजरात जोरदार व उत्साहाने  विशेष स्वागत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. 

शाळेचा पहीला दिवस नेहमीच नव्या अपेक्षा नवी उमेद घेवून येतो या वर्षीही या परंपरेला अनुसरून न्यू इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेत अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. जयकिरण प्रभाजी संचालित न्यू इंग्लिश मिडियम स्कूल येथे विद्येची देवता माता सरस्वतीचे पुजन करून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेश द्वारावर त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी, फुले, फुगे, रंगीबेरंगी पताका लावून, स्वागत फलक तसेच विद्यार्थ्यांचे औक्षण करून हसतमुख शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुलाबपुष्प तसेच फुलांचा वर्षाव करून ढोल ताशाच्या गजरात जोरदार व उत्साहाने स्वागत करण्यात आले.

या वेळी पालक वर्ग देखिल उपस्थित होता शाळेचा पहीला दिवस नेहमीच नव्या अपेक्षा नवी उमेद घेवून येतो या वर्षीही या परंपरेला अनुसरून न्यू इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेत अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, सचिव जीवन जैन,सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी, संचालक संजय चोरडीया, गुलाब राठोड प्रभुलाल शर्मा, गोपाल पटवारी, प्रिती जैन, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर, शेखरकुमार धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव प्रिती शर्मा, योगिता शेंडे, पुजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, सविता माळी, रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे, संगिता पाटकरी, पुजा अहिरे,पुनम कुमावत,शालिनी महाजन, कल्पना बोरसे, रुक्मिणी कासार, पुजा देसले, निवृत्ती तांदळे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राम्हणे, सुनिता शिंपी, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, मनिषा पाटील, शितल पाटील, शिवाजी पाटील, विकास मोरे या सर्वांच्या अथक परिश्रमाने आजचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे