ब्रेकिंग

Pachora | पाचोऱ्यात “ऑपरेशन सिंदूर रक्तदान अभियानास रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद..

पाचोरा | झूम मराठी ऑनलाईन

पाचोरा नगरपरिषद, रोटरी क्लब पाचोरा-भडगाव व पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन सिंदूर रक्तदान अभियानास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

पाचोरा नगरपरिषद, रोटरी क्लब पाचोरा-भडगाव व पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन सिंदूर रक्तदान अभियान” दिनांक 14 मे 2025 बुधवार रोजी सकाळी 8 ते 12 वाजेदरम्यान हुतात्मा स्मारक छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा येथे आयोजीत करण्यात आलेले होते. सदरच्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळालेला असून यात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी, दुर्गेश सोनवणे नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी, शिवाजी शिंदे, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ.गोरख महाजन, चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, प्रदिप पाटील, निलेश कोटेचा, डॉ.मुकेश तेली, डॉ.अजयसींग परदेशी, डॉ.अमोल जाधव व डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी / सदस्य उपस्थित होते. तसेच रेड प्लस सोसायटी, जळगांव या रक्तपेढी तर्फे डॉ.रविंद्र पाटील, डॉ.अमोल पाटील, डॉ. दिपक पाटील, परिचारीका कु.वैष्णवी यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे