आपल खान्देशगुन्हेगारी

भुसावळ – दिडलाखांत मिळवलेली नवरी पसार; नवरदेव बसला वाट पाहत

झूम मराठी वृत्तसेवा

भुसावळ : लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हेशाखेला अटक करण्यात आली आहे. जळगावच्या कांचन नगरातून गोकुळ रविंद्र सोनार (वय ३०) आणि सोनाली गोकूळ सोनार (वय २८, दोन्ही रा. साकेगाव ता. भुसावळ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

लग्नासाठी समाजात मुलगी मिळत नसल्याने शिंदी (ता. भडगाव) येथील २८ वर्षीय तरूणाच्या कुटूंबीयांना दिड लाखांत नवरी मिळवुन देण्याचा प्रस्ताव देत सोनाली गोकुळ सोनार, गोकूळ रविंद्र सोनार (दोघ. रा. साकेगाव ता. भुसावळ, आशा नानासाहेब निकम रा. नाशिक), अशोक वीरसिंग खाडे (रा. मालदा ता. शहादा जि.नंदुरबार) आणि गुड्डीबाई समाधान शिंपी (रा. गाळण ता. पाचोरा) यांनी भेट घेवून तरूणाचा विश्वास संपादन करून आमच्या ओळखीची मुलगी असल्याचे सांगितले. त्यासाठी दीड लाख रूपये खर्च करावे लागतील. त्यानुसार तरूणाच्या कुटुंबियांनी लग्नासाठी होकार दिला आणि (ता.३० ऑगस्ट २०२१) रोजी नशिराबाद येथील एका तरूणीशी लग्न लावून दिले.

तरूणासोबत नवविवाहिता राहिल्यानंतर ही भुसावळ येथे जावून येते असे सांगून सोबत दागिने घेवून भूसावळ येथून पसार झाली होती. बरेच दिवस उलटूनही नवरी परत येत नसल्याने तपास केला असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. नवरीसह सहा जणांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी हे जळगाव शहरात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाली, त्यानुसार बुधवारी (८ डिसेबर) रोजी दुपारी पथकातील उपनिरीक्षक अमोल देवढे, लक्ष्मण पाटील, विनोद पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, ईश्वर पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी गोकुळे रविंद्र सोनार (वय ३०) याला तालुक्यातील इदगाव येथून तर सोनाली गोकूळ सोनार (वय २८) हिला कांचन नगरातून अटक केली आहे. दोघांना भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे