आपल खान्देश

‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरते लोक अदालत पाचोरा तालुक्यात..

जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकील बार पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने २३.०४.२०२५ रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन आवार तालुका पाचोरा येथे तसेच दिनांक २४.०४.२०२५ रोजी पाचोरा पोलीस स्टेशन आवार पाचोरा येथे सदरील मोबाईल लोक अदालत व्हॅन च्या माध्यमातून फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

उच्च न्यायालय विधी सेवा उप समिती औरंगाबाद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये  एप्रिल २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्यात फिरते (मोबाईल) लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोबाईल व्हॅन पाचोरा तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यात दिनांक ०१.०४.२०२५ ते २९.०४.२०२५ या कालावधीत फिरणार असून त्याच अनुषंगाने तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकील बार पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २३.०४.२०२५ रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन आवार तालुका पाचोरा येथे तसेच दिनांक २४.०४.२०२५ रोजी पाचोरा पोलीस स्टेशन आवार पाचोरा येथे सदरील मोबाईल लोक अदालत व्हॅन च्या माध्यमातून फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी जनजागृती करिता कायदेविषयक शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सदरील मोबाईल लोक अदालतच्या माध्यमातून फिरते लोकन्यायालयाचे आयोजन नियोजन, चर्चा व विचार विनिमय करण्याकरिता घेण्यात आलेल्या आढावा सभेमध्ये श्री एस.व्ही. निमसे साहेब, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती पाचोरा तथा दिवाणी न्यायाधीश पाचोरा तसेच श्रीमती जी. एस. बोरा मॅडम सहदिवाणी न्यायाधीश पाचोरा तसेच तालुक्यातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ विधीज्ञ उपस्थित होते. या लोक अदालत मध्ये नेहमी दिवाणी दावे, नियमित दरखास्त, फौजदारी खटले, धनादेशात अनादर, वैवाहिक प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले व ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येणे शक्य आहे असे दिवाणी व फौजदारी खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवता येतील.

याप्रसंगी मा.न्यायाधीश एस.व्ही. निमसे साहेब यांनी पाचोरा तालुका परिसरातील नागरिकांना आवाहन केले की दिनांक २३ व २४ एप्रिल रोजी होणाऱ्या फिरते लोक अदालत मध्ये पाचोरा न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या वादातील प्रकरणे तडजोडीने सोडविण्याकरिता जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा व सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच जनजागृती करता कायदेविषयक शिबिराचे देखील आयोजन केलेले असून त्याचा देखील फायदा घ्यावा व आपल्या प्रलंबित केसेस फिरते लोक अदालत मध्ये ठेवण्यासाठी तालुका विधी सेवा समिती कार्यालय, पाचोरा यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे