नाशिक जवळ पवन एक्सप्रेसचे आकारा डब्बे घसरले!
अपघातात एक प्रवाशी ठार तर 15 प्रवासी जखमी
झूम मराठी
मुंबईहून जयनगरसाठी निघालेल्या डाऊन 11061 डाऊन एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे 11 डबे रेल्वे रूळावरून घसरल्याची नाशिकजवळ घडली. रविवार, 3 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत सुमारे 15 प्रवासी जखमी झाले असून त्यात तीन तिकीट निरीक्षकांचा समावेश असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात असून या अपघातामुळे डाऊन लाईनवरील ईगतपुरी-मनमाड दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गाड्या ईगतपुरी, कसारा आदी रेल्वे स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.
पवन एक्स्प्रेसचे चार डबे लहावीट-देवळाली दरम्यान रविवारी दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास घसरले. या अपघाताचे ठोस कारण स्पष्ट झाले नसलेतरी रेल्वे रूळाला तडे गेल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज आहे.
रेल्वे अपघातात 15 प्रवासी जखमी
डाऊन पवन एक्स्प्रेसच्या अपघातातील सुमारे 15 रेल्वे प्रवासी जखमी झाले असून त्यात रेल्वेतील तीन तिकीट निरीक्षकांचा समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले आहे. रेल्वे अपघातामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून अप मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.



