विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाचोऱ्यात नेत्र तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद..
पाचोरा – सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था व सुभाकाशी बहुउद्देशीय संस्था संचालित न्यु माउली नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त नवकार प्लाझा येथे नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला होता.

आज दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शिबिराची डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रदीप धेंडे , ऍडव्होकेट अविनाश भालेराव , पत्रकार प्रा. डॉ . योगेश पाटील , गोपाल नाईक नगरसेवक अशोक ब्राह्मणे भालचंद्र ब्राह्मणे संतोष कदम आदींनी अभिवादन करून शिबिराची सुरवात केली तर सायंकाळी ५ वाजता शिबिराची सांगता करण्यात आली .शिबिराच्या सुरवातीस प्रा. डॉ. योगेश पाटील यांनी शिबिराचे आयोजन व संस्थेविषयी जमलेल्या मान्यवरांना माहिती दिली . शिबिरास नागसेन नगर , छत्रपती शिवाजी नगर , मिशमीला नगर , नूरानी नगर , जनता वसाहत , जारगाव चौफुली भाग , इत्याती ठिकाणच्या नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला जवळपास १५० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला प्रसंगी डॉ. प्रदीप धेंडे ,ऍडव्होकेट अविनाश भालेराव , न्यूज झेप इंडिया संपादक पत्रकार डॉ योगेश पाटील ,न्यूज झेप इंडियाचे ब्युरो संजय पाटील , गोपाल नाईक , नगरसेवक अशोक मोरे , सचिन मेडिकोचे राहुल मराठे , रितेश अहिरे , अमोल म्हस्के , दीपक वाकडे शैबाज बागवान , दीपक गायकवाड , जितू नाईक , संदीप राठोड , आवडो मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी आकाश नन्नवरे विनोद शेजवळ धीरज खेडकर दीपक सोनवणे , दीपक कोतकर , अंकित अहिरे , राहुल शिंदे , शहबाज बागवान यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


