आपल खान्देशब्रेकिंग

पाचोरा शहरातील जयकिरण न्यू इंग्लिश स्कुल जवळ, मेनहोलचे दहा दिवसा पासून झाकण तुटले..!

पाचोरा शहरातील जयकिरण प्रभाजी संचलित, न्य इंग्लिश शाळे जवळ च्या वृंदावन नगर रोड वरील मेनहोलचे दहा दिवसा पासून झाकण तुटले मात्र पालिका प्रशासन झोपेत आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाल्या शिवाय राहणार नाही..

पहा येथे व्हिडीओ युट्युब..

पाचोरा शहरातील जयकिरण न्य इंग्लिश शाळे जवळ च्या वृंदावन नगर मधील राजीव गांधी कॉलनी रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा मेनहोल उघडा पडला आहे. यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला आहे. दुचाकीस्वार अथवा अन्य छोटे वाहन या खड्ड्यात अडकल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.

पाचोरा पालिकेच्या संबंधित अधिकारीनां तक्रार दिली असून, पालिका प्रशासन सुस्त आहे का? तातडीने दखल न घेतल्यास नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. या धोकादायक परिस्थितीला त्वरित आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मेनहोल दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे