पाचोऱ्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे मूक पदयात्रा:धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाची समाप्ती
- पाचोरा | दिलीप जय परदेशी.
धर्मासाठी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाचोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून राजे संभाजी महाराज चौकात मूक पदयात्रा काढून बलिदान मासाचा समारोप करण्यात आला. मूक पदयात्रेत मोठया संख्येने युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान पाचोराच्या वतीने मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संभाजी भिडे गुरुजीं यांच्या संकल्पनेवरून हुतात्मा दिन साजरा केला जात असतो. बलिदान मास दरम्यान, शिवभक्त, संभाजी भक्त त्यांचे आवडते अन्न खाणे टाळतात तर काही जण महिनाभर बूट न घालता चालण्याची प्रतिज्ञा घेतात. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करून त्यांची हत्या केली. संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मूक मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून, भुयारी मार्ग, भडगाव रोड ते राजे संभाजी महाराज चौका पर्यत आज सायंकाळी मशाल हातात घेऊन मूक पदयात्रा काढण्यात आली आणि ध्यानमहोत्सवाने मूक पदयात्रेचा समारोप करण्यात आले यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


