ब्रेकिंग

बदलापूरमध्ये भरणार भव्य खान्देश महोत्सव..

खान्देशला अतिशय संपन्न आणि वैभवशाली संस्कृती लाभली आहे. या संस्कृतीचा अभ्यास व्हावा तेथील संस्कृतीचे दर्शन घडावे यासाठी हा महोत्सव

 

बदलापूर |

बदलापूर शहरात वामन म्हात्रे फाउंडेशन आणि खान्देश प्रतिष्ठान बदलापूर यांच्या वतीने येत्या शनिवार, दि.२९ मार्च २०२५ रोजी सायं. ४ ते १० वाजेपर्यंत  शिरगांव छत्रपती शिवाजी महाराज मैदानात माऊली चौक येथे भव्य खान्देश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

मनोरंजन, ज्ञान आणि प्रबोधन ही त्रिसूत्री अंगीकारुन खान्देशी समाजाच्या विकासासाठी कटिबध्द असणाऱ्या वामन म्हात्रे फाऊंडेशन आणि खान्देश प्रतिष्ठान बदलापूर २०२५ या समाज सोहळयाचे आयोजन शनिवार, दि.२९ मार्च २०२५ रोजी सायं. ४ ते १० वाजेपर्यंत करण्यात आले असून, या महोत्सव सोहळयामध्ये कला, नृत्याभिनय, खान्देशी समाज संस्कृतिचे कला अविष्कार असणार आहेत. त्याच बरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांचे उद्बोधक विचार जाणून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

बदलापूर खान्देश महोत्सवातून बदलापूरमधील खान्देशवासियांना खान्देशच्या अद्वितीय संस्कृतीचे विविध पैलू अनुभवता येणार आहे, यांचबरोबर खान्देशी कलाकार गौतमी पाटील, सचिन कुमावत, अनेक रील्स स्टार मनोरंजन करणार आहेत. महोत्सवात खानदेशी कला, खाद्य व कृषी संस्कृतीचे दालन खुले राहणार आहे, खान्देश महोत्सव म्हणजे मातीशी नातं सांगणारा उत्सव असणार आहे. संस्कृतीचा अभ्यास व्हावा तेथील संस्कृतीचे दर्शन घडावे यासाठी  खान्देश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे