राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्रच्या ॲड.योगेश परदेशी यांची कुसुंबा जिल्हा परिषद गट अध्यक्षपदी निवड
कुसुंबा (धुळे) : सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदान व समाजसेवेत दिलेल्या भरीव योगदानाच्या आधारावर ॲड.योगेश छबिलाल परदेशी कुसुंबा यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र कुसुंबा जिल्हा परिषद गट अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भटूआप्पा पुंडलिक नेरकर, कुसुंबा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली. महासंघाच्या कार्यकारिणीने एकमताने ॲड. योगेश परदेशी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असून, त्यांच्याकडून कुसुंबा ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि उन्नतीसाठी भरीव कार्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या निवडीप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख अजय अशोक चौधरी, जामनेर यांनी ॲड.योगेश परदेशी यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. तसेच, कुसुंबा ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी नव्या जबाबदारीतून ते अधिक सक्षमपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या निवडीमुळे कुसुंबा ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण व उन्नतीसाठी नवी दिशा मिळेल, अशी भावना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.



